Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राखी सावंतला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात..

राखी सावंतला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात..


मुंबई: ड्रामा क्वीन राखी सावंतसंबंधी एक मोठी गोष्ट समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीनंतर आता आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. स्वतः शर्लिनने ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली. असं म्हटलं जातं की, राखी आज दुपारी पती आदिल दुर्रानीसोबत तिच्या डान्स अकादमीचं उद्घाटन करणार होती. पण याआधीच तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले.

शर्लिन चोप्राने ट्वीट करत लिहिले की, 'आंबोली पोलिसांनी एफआयआर ८८३/२०२२ प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.' नोव्हेंबर २०२२ मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. यासोबतच पत्रकार परिषद घेत राखीने तिचाअश्लील व्हिडिओ दाखवत असभ्य भाषा वापरल्याचा आरोप शर्लिनने केला होता.दरम्यान, सध्या राखीची आई रुग्णालयात दाखल आहेत. ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त असलेल्या राखीच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. राखी तिच्या आजारी आईच्या प्रकृतीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, यात राखीचा आईसोबतचा रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती आईच्या चिंतेने रडताना दिसत आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य तिला सांत्वन देताना दिसत आहेत.

आता लोकांना हा व्हिडिओ आवडला नसून त्यांनी राखीला खाजगी गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी ट्रोल केलं. यासोबतच राखीने सात महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर आदिल दुर्रानीशी मुस्लिम प्रथेनुसार लग्न केलं. काही दिवसांपूर्वी आदिल राखीशी कोणत्याही प्रकारे लग्न न झाल्याचं बोलत होता. मात्र नंतर त्याने राखीसोबतचं लग्न मान्य केलं आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.