Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता फक्त आधार क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही

आता फक्त आधार क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही


देशातील प्रत्येक नागरिकाकडे आज आधार कार्ड आहे. तुम्ही आधार कार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणूनच नाही, तर आधार कार्डच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता. त्याचबरोबर आता तुम्ही फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) च्या मदतीने तुम्ही डिजिटल व्यवहार करू शकता. आधारच्या मदतीने तुम्ही कसे करू शकतात आर्थिक व्यवहार हे जाणून घेऊ...

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली आधार क्रमांक, iris स्कॅन आणि फिंगरप्रिंटसह व्हेरिफिकेशन करून एटीएमद्वारे आर्थिक व्यवहारांना परवानगी देते. ही प्रणाली अतिशय सुरक्षित पर्याय समजली जाते. कारण त्यासाठी तुम्हाला बँक तपशील देण्याची आवश्यकता नाही.

आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे

जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तुमचे खाते बँकेशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या प्रणालीतून पैसे काढू शकणार नाही. या प्रणाली अंतर्गत, व्यवहार करण्यासाठी कोणत्याही ओटीपी आणि पिनची आवश्यकता नाही. एक आधार कार्ड अनेक बँक खात्यांशी जोडले जाऊ शकते.

AePS प्रणालीवर कोणत्या सेवा AePS प्रणालीच्या मदतीने तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता. यासोबतच बॅलन्स तपासणे, पैसे जमा करणे आणि आधार वरून निधी हस्तांतरित करणे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मिनी बँक स्टेटमेंट आणि eKYC द्वारे फिंगर डिटेक्शन इत्यादी सुविधा मिळू शकतात.

 AePS प्रणाली कशी वापरायची?

तुमच्या क्षेत्रातील बँकिंग करस्पाँडंटकडे जा. आता OPS मशिनमध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर पैसे काढणे, ठेव, केवायसी आणि शिल्लक चौकशी इ. यासारखी कोणतीही एक सेवा निवडा. आता बँकेचे नाव आणि काढायची रक्कम टाका. यानंतर बायोमेट्रिक व्यवहाराची व्हेरिफिकेशन करा, त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.