Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'क्रॅकेन' कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतरही संसर्गाचा धोका...

'क्रॅकेन' कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतरही संसर्गाचा धोका...


कोरोना विषाणूचा 'क्रॅकेन' व्हेरियंट सर्वात वेगाने पसरणारा विषाणू आहे. युरोपिय संघाच्या रोग नियंत्रण विभागाने सांगितले आहे की, अमेरिकेत कोरोनाच्या क्रॅकेन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. लसीकरणानंतरही या विषाणूच्या संसर्गाचा धोका आहे. या व्हेरियंटमुळे दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात लोक क्रॅकेन व्हेरियंटच्या संसर्गाला बळी पडत आहेत. दरम्यान, क्रॅकेन हा कोरोनाचा नवी व्हेरियंट नाही. कोरोनाच्या एक्सबीबी 1.5 व्हेरियंटलाच 'क्रॅकेन' व्हेरियंट असंही म्हटलं जाते.

XBB.1.5 व्हेरियंटलाच क्रॅकेन असं नाव

शास्त्रज्ञांकडून ओमायक्रॉनच्या XBB.1.5 या स्ट्रेनला क्रॅकेन असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्यामुळे क्रॅकेन हे नवीन नाव ऐकून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा आधीच अस्तित्वात असलेला कोरोनाचा सब-व्हेरियंट आहे. मात्र, नागरिकांना खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण क्रॅकेन म्हणजेच XBB.1.5 हा सर्वाधिक संसर्ग होणारा कोरोना विषाणूचा प्रकार आहे. सध्या अमेरिकेमध्ये XBB व्हेरियंटने कहर माजवला आहे. अनेकांना याचा संसर्ग झाला आहे.

XBB 1.5 व्हेरियंट

XBB 1.5 व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या दोन म्यूटेशन म्हणजेच सबव्हेरियंटचा मिळून तयार झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाचा हा प्रकार सर्वाधिक संसर्गजन्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या देशामध्येही XBB व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे.

अमेरिकेतील 41 टक्के रुग्णांना क्रॅकेनचा संसर्ग

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये XBB 1.5 व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत आहे. भारतासह सुमारे 28 देशांमध्ये क्रॅकेन विषाणूचा संसर्घ पसरला आहे. नॅशनल IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते, XBB.1.5 ही XBB चा अपग्रेड प्रकार आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील 41 टक्के रुग्णांना क्रॅकेन प्रकाराचा संसर्ग झाला आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातील काही ठिकाणी XBB.1.5 ची प्रकरणे आढळून आली आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.