Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'चला हवा येऊ द्या' मधून 'या' प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट

'चला हवा येऊ द्या' मधून 'या' प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट


मुंबई, 11 : झी मराठीवरील विनोदी शो 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. भाऊ कदम ते श्रेया बुगडे अशा सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. शोमधील कलाकारांचा अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे हा शो नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत पुढे असतो.

दरम्यान आता या लोकप्रिय शोमधून एका अभिनेत्याने निरोप घेतल्याचं समोर आलं आहे. 'चला हवा येऊ द्या' हा अतिशय लोकप्रिय विनोदी शो आहे. यामध्ये मराठी-हिंदीचे विविध कलाकार आपल्या चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. या कलाकरांना शोमध्ये विनोदाची अप्रतिम मेजवानी दिली जाते. निलेश साबळे, भाऊ कदम,सागर कारंडे,कुशल बद्रिके,श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम यांसारखे कलाकार आपल्या अचूक विनोदाच्या जोरावर शोमध्ये धुमाकूळ माजवतात. परंतु आता या शोबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या शोमधून एका कलाकाराने निरोप घेतला आहे.

खरं तर याशोमधून कोणत्याही विनोदी अभिनेत्याने नव्हे तर परिक्षकाने निरोप घेतला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल आम्ही कोणाबाबत बोलतोय. 'चला हवा येऊ द्या' यशोमधून स्वप्निल जोशीने एक्झिट घेतली आहे. स्वप्निल जोशी या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत होता. याशोमध्ये स्वप्निल जोशीच्या एन्ट्रीने त्याचे चाहते प्रचंड आनंदित होते. परंतु आता काही महिन्यानंतर स्वप्निल या मालिकेतून निरोप घेत आहे. मनोरंजन मराठीच्या इन्स्टा पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. अभिनेता याशोमधून का निरोप घेत आहे?

याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय.

तसेच स्वप्निल जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत अपडेट्स देत असतो. अभिनेता आपल्या व्यावसायिक आयुष्या व्यतिरिक्त खाजगी आयुष्यामध्येसुद्धा धम्माल करत असतो.

स्वप्निल आपल्या मुलगा आणि मुलगीसोबत सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधत असतो. सध्या स्वप्निल जोशी झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत स्वप्निल जोशीसोबत अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.