Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील डेटा दोन वर्षांत महाग झाला; इस्रायलपेक्षा चारपट

भारतातील डेटा दोन वर्षांत महाग झाला; इस्रायलपेक्षा चारपट


नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत डेटाचा दर वेगाने उतरताना दिसत आहे. अमेरिका, कॅनडासारख्या तुलनेत डेटा प्रचंड महाग असलेल्या देशांनीही डेटाचे दर घटवले आहेत. भारत मात्र याला अपवाद आहे. भारतात दोन वर्षांत डेटाचे दर दुप्पट झाले. २०२० मध्ये भारतात डेटाची किंमत जगात सर्वांत कमी होती. ७.३१ रुपयांना मिळणरा १ जीबी डेटा आता सरासरी १३.८१ रुपयांना मिळत आहे.

बलाढ्य देशांमध्येही घट

* अमेरिका, इंग्लंड, नॉर्वे, फिनलंड आदी देशांमध्ये इंटरनेट भारताच्या तुलनेत महाग असले तरी तिथेही २०२० सालच्या तुलनेत डेटाचे दर घटले आहेत.

* केवळ दक्षिण कोरिया आणि येमेनमध्ये डेटाचे दर वाढले आहेत. दक्षिण कोरियात २०२० मध्ये एक जीबी डेटाची किंमत सरासरी ८८८ रुपये इतकी होती. २०२२ मध्ये वाढून ती १,०१८ रुपये इतकी झाली.

इतर देशांमध्ये मात्र दरांमध्ये घट

१. २०२० मध्ये डेटा स्वस्ताईत इस्रायल जगात दुसऱ्या स्थानी होता. तिथे २०२० मध्ये १ जीबी डेटाची किंमत ८. ९४ रुपये इतकी होती. हीच किंमत २०२२ मध्ये ३.२५ रुपये इतकी आहे.

२. डेटा स्वस्ताईच्या बाबतीत इटली २०२० मध्ये चौथ्या स्थानी होता. तिथे १ जीबी डेटाची किंमत ३४.९३ रुपये इतकी होती. हीच किंमत २०२२ मध्ये ९.७५ रुपये इतकी आहे. या किमतीत ७२ टक्क्यांनी घट झाली आहे.

२०२० : भारत सर्वाधिक स्वस्त (किंमत रुपयांमध्ये)

भारत - ७.३१

इस्रायल - ८.९४

किर्गिझस्तान - १७.०६

इटली - ३४.९३

युक्रेन - ३७.३७

२०२२ : भारतात दुप्पटीने वाढ

१३.८१ - भारत

१२.१८ - फिजी

११.३७ - सॅन मरिनो

३.२५ - इस्रायल

९.७५ - इटली


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.