Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा..

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा..


मुंबई : तुम्ही पुढच्या महिन्याची वाट कशाला बघत आहात. आजच काम उद्यावर टाकणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही आधार पॅन लिंक केलं नसेल तर अजूनही संधी गेली नाही. आताच लिंक करुन घ्या.

31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं होईल. तो केवळ एक प्लॅस्टिकचा कागद उरेल. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही आताच आधार पॅन कार्डशी लिंक करुन घ्या. तुम्हाला 1000 रुपये दंड भरून आता ते करता येणार आहे.

31 मार्चनंतर जर तुम्ही पॅनकार्ड लिंक करायला गेलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. आयकर विभागाने सोशल मीडियावर आणि त्यासोबत मोबाईल नंबरवर देखील ग्राहकांना वारंवार आठवण करुन देत आहे. आता या कामासाठी पुढील महिन्याच्या ३१ तारखेपर्यंतच अवधी शिल्लक आहे.

जर तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि हे काम त्वरित पूर्ण करा. कारण जर पॅन बंद झालं तर तुम्ही आयकर भरु शकणार नाही. याशिवाय तुमची बँकेची काही कामं अडू शकतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहू नका. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 30 जूनपासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपयांचा दंड निश्चित केला आहे. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.