Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली गांजा तस्करांना पोलिस कोठडी..

सांगली गांजा तस्करांना पोलिस कोठडी.. 


सांगली:  कवठेपिरान येथे वीस लाखांचा १०२ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांच्या टोळीस काल स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कवठेपिरान परिसरातील शेतात जेरबंद केले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अदिल नासीर शहापुरे (वय ३३, बाबर गल्ली, कोल्हापूर रस्ता, सांगली), सचिन बाबासो चव्हाण (३१, जि. प. शाळेजवळ, कवठेपिरान, ता. मिरज), मयूर सुभाष कोळी (३३, शंभर फुटी रस्ता, सांगली) आणि मतीन रफिक पठाण (३१, काटकर गिरणीसमोर, राधाकृष्ण वसाहत, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कवठेपिरान ते सर्वोदय कारखाना या रस्त्यावरील बाबासो चव्हाण यांच्या शेतामध्ये काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी सापळा लावला होता. त्यामधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने आणि चौघांची झडती घेतली असता वाहनांमध्ये विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजारांचा १०२ किलो वाळलेला गांजा आढळला. चौघांवरही ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.