Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चीनी सरकारकडून विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याची विनंती; बदल्यात मिळत आहे मोठी रक्कम

चीनी सरकारकडून विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याची विनंती; बदल्यात मिळत आहे मोठी रक्कम


चीनमध्ये विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करणे हा उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होत आहे. या नव्या उत्पन्नाच्या मार्गातून विद्यार्थ्यांकडून चीनचा ढासळता प्रजनन दर सावरण्यास मदत होऊ शकते. बीजिंग आणि शांघायसहित संपूर्ण चीनमध्ये अनेक शुक्राणू दान केंद्रात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याचं आवाहन केलं जात आहे. एका मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार, चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचं आवाहन हे चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'वीबो'वर ट्रेंडिग टॉपिक झाला आहे. या विषयावर मोठ्या संख्येने नेटकरी चर्चा करताना दिसत आहे.

शुक्राणू दान करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना युन्नान ह्युमन शुक्राणू बँकेने सर्वात आधी विनंती केली होती. या बँकेने विनंती केल्यानंतर विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याचे फायदे, नोंदणीच्या अटी, सबसिडी आणि शुक्राणू दान करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. या बँकेनंतर चीनच्या अन्य प्रांत आणि शहरातूनही अन्य काही शुक्राणू बँकेने शुक्राणू दान करण्याची विनंती करण्यासाठी पुढाकार घेतला.

शुक्राणू दान करण्यासाठी ठेवल्या अटी

ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, उत्तर पश्चिम चीन प्रांतात विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यानंतर या प्रातांत चर्चेला एकच उधाण आलं. सहा दशकात पहिल्यांदा २०२२ मध्ये चीनी लोकसंख्या कमी झाल्याची नोंद पाहायला मिळाली.

युन्नान शुक्राणू बँकेच्या अटीनुसार, शुक्राणू दान करणारा व्यक्ती २० ते ४० या वयोगटातील असला पाहिजे. त्या व्यक्तीची उंची १६५ सेमी पेक्षा अधिक असली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुवंशिक रोग नसला पाहिजे. त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची पदवी असली पाहिजे किंवा तो व्यक्ती एखाद्या पदवीसाठी शिक्षण घेणारा असावा. जीटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दान करण्याऱ्या व्यक्तीला आरोग्य तपासणी करावी लागेल. जो व्यक्ती पात्र होईल आणि ८ ते १२ वेळा शुक्राणू दान केल्यावर ४,५०० युआन (६६४ डॉलर) मिळेल.

शानक्सी शुक्राणू बँकेच्या गरजेनुसार, शुक्राणू दान करणाऱ्या व्यक्तीची उंची १६८ सेमी असली पाहिजे. त्यांना बँकेकडून ५००० युआन (७३४ डॉलर) मिळेल. शांघायमधील एक बँक ७००० युआन (१००० डॉलर) देत आहे. शुक्राणू दान करणारा व्यक्ती हा धुम्रपान किंवा दारूचे व्यसन करणारा नसावा. टक्कल पडलेला नसावा. डोळ्याच्या कोणत्याही गंभीर आजाराने पीडित नसावा.

चीनची लोकसंख्या घटली

चीनच्या लोकसंख्येमध्ये १९६१ नंतरची सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये मृतांची संख्या जन्मलेल्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२२ सालच्या अखेरीस देशाची लोकसंख्या १.४११७५ अब्ज होती, तर २०२१ मध्ये ती १.४१२६० अब्ज होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.