Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूचं व्यसन सोडवतं हे औषध...

दारूचं व्यसन सोडवतं हे औषध...


भारतात मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि एका अंदानुसार, या न्यू ईअरला तर आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. दारूमुळे केवळ आरोग्य बिघडतं नाही तर याने गुन्हे आणि कौटुंबिक हिंसाही वाढते. सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, बरेच लोक ईच्छा असूनही दारूचं व्यसन सोडू शकत नाहीत. मात्र, अशा लोकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांना एका रिसर्च दरम्यान दारू सोडवणारं प्रभावी औषध सापडलं आहे. या औषधाची खासियत म्हणजे व्यक्ती आपणहून ही सवय सोडण्यासाठी भाग पडतो.

कुठे आणि कुणी केला रिसर्च?

​The Journal of Clinical Investigation वर प्रकाशित रिसर्च Oregon Health and Science University आणि इतर काही संस्थांच्या वैज्ञानिकांनी मिळून अमेरिकेत केला. दारू सोडवणाऱ्या या औषधाचा प्रभाव पाहून वैज्ञानिक अवाक् झाले. रिसर्चच्या सहलेखिका Angela Ozburn म्हणाल्या की, मी असा प्रभाव याआधी कधी पाहिला नाही.

या औषधाने सुटतं दारूचं जुनं व्यसन

वैज्ञानिकांना आढळलं की, एप्रेमिलास्ट दवा (Apremilast Drug) चं सेवन केल्यावर दारू पिण्याचं मन होत नाही. हा रिसर्च मनुष्यांआधी प्राण्यांवर करण्यात आला. ज्याचा प्रभाव पाहून वैज्ञानिक अवाक् झाले. हा शोध फार महत्वाचा मानला जात आहे.

कोणत्या आजारावर कामी येतं एप्रेमिलास्ट?

वैज्ञानिकांनुसार, एप्रेमिलास्ट एफडीए प्रमाणित एंटी-इंफ्लामेटरी औषध आहे. याचा वापर सोरायसिस उपचारासाठी केला जातो. हे औषध सोरायसिसमुळे होणाऱ्या आर्थराइटिसलाही ठीक करण्यास मदत करतं. या औषधाच्या सेवनाने हेवी ड्रिंकर्स सवय मोडण्यासाठी मदत मिळू शकते.

कसं करतं काम?

वैज्ञानिकांनी सांगितलं की, हे औषध nucleus accumbens ची गतिविधि वाढवतं. हा मेंदूचा असा भाग असतो जो दारूच्या सेवनाला नियंत्रित करण्यास मदत करतो. ज्या लोकांना दारूचं व्यसन सोडायचं आहे त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकतं.

ज्या लोकांना दारू पिण्याचं व्यसन लागतं ते दिवसातून अनेक पेग पितात. पण शोधानुसार, दारू सोडवणारं हे औषध अल्कोहोलची ईच्छाच अर्ध्यापेक्षा जास्त कमी करून टाकते. म्हणजे जर एखादी व्यक्ती दिवसातून 5 पेग घेत असेल तर या औषधाचा वापर करून ते 2 पेगपर्यंत कंट्रोल करू शकतात.

हे अवयव वाचतात...

दारूचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील अनेक अवयव खराब होतात. जे या औषधामुळे वाचू शकतात. NIAAA नुसार, एल्कोहॉलमुळे मेंदू, हृदय. लिव्हर, पॅंक्रियाज, इम्यून सिस्टम कमजोर होतं. तसेच कॅन्सरचा धोकाही वाढतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.