Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता रक्तही महागले!

आता रक्तही महागले!


रक्त आणि रक्तामधील घटक (रेड सेल्स) यांच्या दरांमध्ये वाढ होणार असून, सरकारी रक्तपेढय़ांत 50 रुपयांनी, तर खासगी रक्तपेढय़ांत 100 रुपयांनी दर वाढणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. रक्त संकलन आणि साठवण्यासाठी रक्तपेढय़ांना खर्च येत असल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय महाविद्यालय संलग्न सरकारी रुग्णालयात दाखल असणाऱया रुग्णांना रक्त व रक्तघटक मोफत उपलब्ध करून देण्याची सवलत सुरूच राहणार आहे. 'रेड सेल'चे दर 100 रुपयांनी वाढले, तर इतर घटकांचे दर वाढलेले नाहीत. परिणामी रुग्णांना फार आर्थिक फटका बसणार नाही.

कर्करोग, डायलिसिस, बायपास सर्जरी अशा रुग्णांना जास्त प्रमाणात रक्ताची गरज लागते. त्यामुळे अशा रुग्णांचा विचार करता, त्यांना काही सवलत मिळणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. रुग्णांना कमी दरात रक्त मिळावे म्हणून रक्तपिशव्यांच्या बॅगवरील जीएसटी कमी करायला हवा, अशी मागणी होत आहे.

आठ वर्षांनंतर झाली दरवाढ

रक्त आणि रक्तातील घटक यांचे दर 2014 मध्ये ठरवण्यात आले होते. त्यावेळी सरासरी 400 ते 450 रुपयांनी दर वाढले होते. त्यानंतर प्रथमच आता दरवाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या दरवाढीबाबत राज्य सरकारला जून 2022 मध्ये सूचना केल्या होत्या, त्यानुसार आता दरवाढ झाली आहे.

रक्ताच्या पिशवीचे नवे दर

(प्रतिपिशवी 350 मि.लि.)

रक्तपेढी पूर्वीचे दर नवे दर

सरकारी 1050 1100

खासगी 1450 1550


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.