Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"देवेंद्र फडणवीस यांनी मला धमकी दिली", माजी महापौरांचा गौप्यस्फोट

"देवेंद्र फडणवीस यांनी मला धमकी दिली", माजी महापौरांचा गौप्यस्फोट


पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. मी महापौर असताना 'स्मार्ट सिटी'च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर महापौरांचे नावच नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मी घेतला. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन वरून तुम्हाला हे त्रासदायक होईल असे म्हटले होते, असा खुलासा प्रशांत जगताप यांनी केला. मात्र यानंतर फडणवीस यांनी दिलगिरीही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

'स्मार्ट सिटी'च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते आणि याच्या पत्रिकाही छापल्या होत्या. मात्र या पत्रिकेमध्ये महापौर म्हणून माझ्या नावाचा उल्लेख नव्हता. ही बाब आपण ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याही निदर्शनास आणून दिली आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दिली होती.

शरद पवार यांनी पुणेकरांना काय आवडेल हे पाहूण निर्णय घेण्यास सांगितले. त्यामुळे महापौर म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सायंकाळी मी कार्यक्रमाला गेलो. तिथे पालकमंत्री गिरीश बापट यांनी थेट फडणवीस यांना फोन लावून दिला. त्यावेळी फडणवीस यांनी हा कार्यक्रम पंतप्रधानांचा असून तुम्हाला याचा पुढे त्रास होईल असे धमकीवजा सौम्य शब्दांमध्ये सांगितले. तसेच महापौरांचे नाव नाही यात राज्य सरकार किंवा माझे काहीच नाही, तो पंतप्रधान कार्यालयाचा कॉल आहे. त्यामुळे विचार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यानंतर शरद पवार यांनी रात्री फोन करून मला काही मेसेज आलाय का विचारले. मी नाही म्हणताच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेले निवेदन वाचून दाखवले. यात निमंत्रण पत्रिकेमध्ये पुण्याच्या महापौरांचे नाव चुकून राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दुसऱ्या दिवशी चर्चा करत वादावर पडदा टाकला. त्यानंतर मी कार्यक्रमाला गेलो, असेही जगताप यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.