Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’अभिनेता..

आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’अभिनेता..


गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य कलाकारांनी जगभरात आपला डंका वाजवला आहे. उत्तमोत्तम चित्रपट देत दाक्षिणात्य चित्रपट जगभरात प्रसिद्ध होत आहेत. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करणारे कलाकारही फक्त प्रसिद्धीच्या बाबतीतच नाही तर संपत्तीच्या बाबतीतही जगभरातील बड्या स्टार्सना टक्कर देत आहेत. आता एक सुप्रसिद्ध अभिनेते लग्झरी गाडीतून नाही तर थेट हेलिकॉप्टरने शूटिंगसाठी यायचे असं समोर आलं आहे.

अनेक दाक्षिणात्य अभिनेते मानधनाच्या बाबतीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही पुढे आहेत. यातीलच एक म्हणजे अभिनेते कमल हासन. कमल हासन यांचं दिसणं, त्यांचा अभिनय, त्यांची देहबोली हे सगळंच चाहत्यांना आकर्षित करणारं आहे. त्याचमुळे आजही त्यांच्या नावाची जादु काही कमी झालेली नाही. त्यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन मोठा विक्रम केला होता. सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून कमल हासन यांचे नाव घ्यावे लागेल. 

तर कमल हासन सध्या त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली. कमल हासन सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या पहिला भाग सुपरहिट झाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर कमल हासन आलिशान गाडी नाही तर रोज चक्क हेलिकॉप्टरमधून येतात, असं समोर आलं आहे. आता कमल हासन यांचा हा अंदाज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. या चित्रपटासाठी कमल हसन यांनी १५० कोटी रुपये घेतले आहेत असंही बोललं जात आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.