Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गभर्वती वनरक्षक महिलेचे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत उपोषण

गभर्वती वनरक्षक महिलेचे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत उपोषणसांगली : शिराळा वनक्षेत्रातील रेड येथे वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रायना बापू पाटोळे यांनी मंगळवारपासून उपवनसंरक्षक कायार्लयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान पाटोळे या गभर्वती असून त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. पाटोळे यांनी दिलेल्या निवेदनात वन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.    

पाटोळे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या कायर्क्षेत्रातील शेखरवाडी-इंग्रूळ रस्त्याचे काम होणार होते. त्यावेळी पाटोळे यांनी बांधकाम विभाग आणि ठेकेदाराला परवाना घेतल्याशिवाय काम करू नका असे सांगितले होते. त्याबाबत वनक्षेत्रपाल आणि वनपाल यांनाही कळवले होते. मात्र वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तडजोड करून ते काम करण्यास भाग पाडले. शिवाय ४५० ब्रास दगडाचे उत्खननही करण्यात आले. याबाबत माझी जबाबदारी असल्याने मी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम माझ्यामुळे बंद पडले असे ग्रामस्थांना सांगून माझी बदनामी केली असेही निवेदनात म्हटले आहे.    
 याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही मला न्याय मिळाला नाही. त्यानंतर मी याबाबत वनमंत्र्यांकडे तक्रार केली. मी मागासवगीर्य असल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या कायर्क्षेत्रातील ग्रामपंचायतींना हाताशी धरून तसेच सरपंचांची पत्रे घेऊन माझ्या निलंबनाची मागणी करण्यात आली. शिवाय मी अट्रॅसिटी, विनयभंगासारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचेही सांगून माझी बदनामी केली आहे. त्यामुळे नियमाला धरून काम करत असतानाही माझ्यावर अन्याय होत असल्यानेच वन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याविरोधात बेमुदत उपोषण करीत असल्याचेही पाटोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.