Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री यावरून फडणवीस थेट पवारांनाच बोलले

सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री यावरून फडणवीस थेट पवारांनाच बोलले


सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्वात आधी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले आहेत. यामुळे हा प्रकार कोण करतंय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. असे असताना यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनाच डिवचले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की भावी म्हणून सांगत असतात.

भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असे कधी कुणाला वाटल होत का ? ते बनले त्यामुळे ज्याला-ज्याला भावी वाटतोय त्याला-त्याला शुभेच्छा, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी भाष्य करत असताना भावी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनाही यावेळी स्पष्ट नाव घेऊन टोला लगावला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री, नाद नाय करायचा अशा आशयाचा फलक लावला होता. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी याची मुंबई पोलीसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.