Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत प्रतापसिंह उद्यान जवळ आढळला अनोळखी मृतदेह..

सांगलीत प्रतापसिंह उद्यान जवळ आढळला अनोळखी मृतदेह..


सांगली: येथील प्रतापसिंह उद्यानाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने तो मृतदेह शवविच्छेदनासाठी शाससकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.

अधिक माहिती अशी, की शहर पोलिस ठाण्याजवळील प्रतापसिंह उद्यानासमोर खोकी आहेत. त्याठिकाणच्या व्यवसायिकास उग्रवास येत असल्याने संशय बळावला. त्यांनी आज सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. एका दुकानाच्या मागील बाजूस एका पडक्या खोलीत एकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने एसआरएफ टीमला पाचारण केले. सडलेल्या अवस्थेतील मृतदेहा हा पुरूषाचा असून त्याची ओळख पटली नव्हती. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशीरापर्यंत ओळख पटली नव्हती. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी होते. एसआरएफचे कैलास वडर, सुमीत गायकवाड, बापु शेंडगे, अमीर नदाफ, निहाल शेख, शिवराज टाकळे यांनी पोलिसांना सहकार्य केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.