Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत

भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत


तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने असोसिएट प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.

भूकंपामुळे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपातील मृतांच्या आकडा 4000 वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शोध आणि बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या भूकंपामध्ये सुमारे 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला आहे. विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून तुर्कीमध्ये पोहोचला आहे. यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले.

भारताची मदत तुर्कीला पोहोचली.

सोमवारी सकाळी तुर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. तुर्की आणि सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.