Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदाराकडे सापडले 6 कोटी..

भाजप आमदाराकडे सापडले 6 कोटी...


'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असले तरी त्यांच्याच पक्षाचे नेते भ्रष्टाचारात बुडाले असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. कर्नाटकातील सत्ताधारी भाजप आमदारपुत्राला 40 लाखांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि अटक केली.

तसेच घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल 6 कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे. दरम्यान, काही महिन्यांवर कर्नाटकातील विधानसभा निवडणूक होणार असून, या लाचखोरीमुळे भाजपची अडचण वाढली आहे. दावणगिरी जिह्यातील चन्नागिरी मतदारसंघाचे भाजप आमदार के. मडल विरुपक्षप्पा यांचा मुलगा व्ही. प्रशांत मडल याला लोकायुक्त पोलिसांनी अटक केली. आमदार विरुपक्षप्पा हे राज्य सरकारच्या कर्नाटक सोप अॅण्ड डिटर्जंट लिमिटेडचे (केएसडीएल) चेअरमन आहेत.

81 लाखांची लाच मागितली होती

* 'केएसडीएल'चे चेअरमन आमदार विरुपक्षप्पा आहेत. त्यांच्या कार्यालयात प्रशांत लाच घेत होता.

* 'केएसडीएल'ला कच्चा माल पुरवठा करणाऱया कंत्राटदाराकडे 81 लाखांची लाच आमदारपुत्राने मागितली होती. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयावर छापा टाकला.

* पोलिसांनी आमदार व त्यांच्या मुलाच्या घरावर छापे टाकून सहा कोटी रुपयांचे घबाड जप्त केले.

म्हैसूर सॅण्डल सोप म्हणून ब्रॅण्ड प्रसिद्ध

कर्नाटक सोप अॅण्ड डिटर्जंट लिमिटेड ही राज्य सरकारची पंपनी आहे. 'म्हैसूर सॅण्डल सोप' या प्रसिद्ध साबणाचा ब्रॅण्ड याच कंपनीकडून तयार केला जातो. कोटय़वधी रुपयांची उलाढाल या कंपनीमध्ये होते. त्यामुळे या कंपनीचे चेअरमन असलेले भाजप आमदार विरुपक्षप्पा यांच्याकडून आतापर्यंत किती घोटाळा केला गेला, याची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.