Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू सोडण्याची आली आहे वेळ!

दारू सोडण्याची आली आहे वेळ!


दारूला आजकाल एन्जॉयमेंटसोबत जोडलं जात आहे. पार्टी असो वा एखादा आनंदाचा क्षण दारू पिणं कॉमन झालं आहे. दारू पिणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. पण तरीही काही लोक कधी कधी दारू पितात तर काही लोक रोज दारू पितात. दारूचं अधिक सेवन केल्याने शरीराचं नुकसान होतं. न्यूट्रिशनल थेरपिस्ट हन्नाह ब्रे यांच्यानुसार, दारूमुळे लिव्हरसोबतच इतरही अवयवांवर नकारात्मक प्रभाव पडतो. नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, पुरूष आणि महिलांनी एका आठवड्यात 14 यूनिटपेक्षा अधिक दारू पिऊ नये जी साधारण 175 मिलीचे 6 ग्लासच्या बरोबर असते. जर कुणी आपला कोटा वाढवला तर शरीर हळूहळू खराब होऊ लागतं. अशात शरीर काही संकेत देतं.

ब्लोटिंग

हन्नाह ब्रे सांगतात की, जर तुम्हाला सतत ब्लोटेड म्हणजे पोट फुगल्यासारखं किंवा जड वाडत असेल तर याचा अर्थ होतो की, दारू तुमच्या पचन तंत्रावर नकारात्मक प्रभाव टाकत आहे. पोटातील चांगले बॅक्टेरिया दारूमुळे प्रभावित होऊ शकतात आणि याने आपल्या आतड्यांचंही नुकसान होतं. जर तुम्हाला सतत ब्लोटिंग वाटत असेल तर लगेच दारू बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आजारी असल्यासारखं वाटणे

हन्नाह यांच्यानुसार, जर तुम्ही नियमितपणे दारूचं अधिक सेवन करत असाल तर तुम्ही सतत आजारी पडण्याचा धोका असतो. कारण याने आपली इम्यूनिटी कमजोर होते. अल्कोहोलचं सतत सेवन केलं तर तुमच्या रक्तातील आजारांशी लढणाऱ्या कोशिकांची संख्या कमी होते. तसेच दारू पिणारे लोक सहजपणे इन्फेक्शन किंवा आजारांचे शिकार होऊ शकतात.

झोपण्यास अडचण

बरेच लोक सात किंवा आठ तासांची झोप घेऊ शकत नाहीत. हन्नाह सांगतात की, दारूमुळे झोप खराब होते. रोज चांगली झोप घेतल्याने आरोग्य चांगलं राहतं. पुरेशी झोप तेवढीच महत्वाची आहे जेवढा चांगला आहार आणि रोज एक्सरसाइज. जर तुम्हाला दारू प्यायल्यानंतर झोप येत नसेल तर समजून घ्या की, दारू सोडण्याची वेळ आली आहे.

त्वचेसंबंधी समस्या

हन्नाह यांच्यानुसार, अल्कोहोलमुळे त्वचेसंबंधी समस्या होतात. फार जास्त दारू प्यायल्याने सध्याची त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते जे तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. दारूमुळे त्वचा शुष्क होते, ज्यामुळे सुरकुकत्या आणि रॅशेज दिसू लागतात. जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर हे दारूमुळे झालं असं समजा.

दातांची समस्या

हन्नाह यांनी सांगितलं की, फार जास्त दारू प्यायल्याने दात खराब होण्याचाही धोका जास्त राहतो. गोड खाद्य पदार्थ आणि ड्रिंक्स तुमच्या तोंडात बॅक्टेरिया वाढवणारे तत्व तयार करतात. याने तुमच्या दातांवर हल्ला केला जातो आणि दात खराब होतात. दात किंवा हिरड्या खराब झाले असतील तर लगेच दारू सोडावी.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.