Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डोळ्यांची नियमीत तपासणी करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

डोळ्यांची नियमीत तपासणी करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन 

सांगली : काचबिंदू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 12 ते 18 मार्च कालावधीत जागतिक काचबिंदु सप्ताह साजरा करण्यात येत आहे. अदृश्य काचबिंदूवर मात करूया हे या वर्षीचे घोषवाक्य असून काचबिंदू रूग्णांनी तपासणी वेळेवर केल्यास काचबिंदूपासून येणारे अंधत्व टाळता येते. यासाठी  डोळ्यांची  नियमीत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

काचबिंदूबाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी ‍सांगितले, काचबिंदूच्या रुग्णांना सुरुवातीला कोणताही प्रकारचा त्रास नसतो. जेंव्हा रुग्णाला अंधुक दिसायला लागते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. काचबिंदू हा चोरपावलाने येणारा डोळ्याचा आजार आहे. यात जे अंधत्व येते ते जवळपास कायमस्वरूपी राहते. त्यामुळे काही त्रास नसेल तरीही ज्याच्यामध्ये काचबिंदूचा धोका असलेली चिन्हे आढळतात त्यांनी काचबिंदूच्या संपूर्ण तपासण्या डॉक्टरांकडून करून घेवून पुढे येणारे अंधत्व टाळता येईल. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आजार थांबविता येतो. मध्यम टप्प्यातील आजाराची प्रगती थांबविता येते. तिसऱ्या टप्यातील आजाराने येणारे अंधत्व हे लांबविता येते. 

काचबिंदूच्या तपासण्या वेळेवर केल्यातर होणाऱ्या काचबिंदूपासून येणारे अंधत्व नक्कीच टाळता येवू शकते. त्यामध्ये टोनोमेट्री ही काचबिंदूची तपासणी असून त्यामध्ये डोळ्याचा दाब मोजला जातो. फंडोस्कोपी या तपासण्या डोळ्याच्या नसेला व नेत्रपटलाला किती प्रमाणात इजा झालेली आहे याचा अंदाज येतो. पेरीमेट्री ही तपासणी काचबिंदुच्या संदर्भात केली जाते. यात डोळ्याची फिल्म ऑफ व्हीजन तपासण्यात येते. यात दृष्टी क्षेत्रात काळे ठिपके पडले आहेत का याचा अंदाज येतो. काचबिंदूचे लवकर निदान करण्याकरीता ही सर्वात प्रभावी तपासणी आहे. त्यामुळे काही त्रास नसला तरी संभाव्य रुग्णांनी चाळीशीनंतर ही तपासणी करून घेतली पाहिजे. काचबिंदू प्राथमिक अवस्थेत असताना त्याच्यावर उपचार करणे शक्य असल्याचे जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. 

डोळ्याची बरीच औषधे ही डोळ्याचा अंतर दाब नियमित आटोक्यात ठेवण्याचे काम करतात. काही औषधे शिरेचा रक्तपुरवठा वाढवितात किंवा मज्जातंतुचा ऱ्हास कमी करतात.  काही औषधे अंतरद्रव्याची निर्मिती कमी करून तात्पुरता दाब कमी करतात. Pilocarpinc हे मुलद्रव्य 60-70 वर्षापुर्वीचे असूनही काही प्रमाणात व तातडीच्या काचबिंदुमध्ये ते उपयोगी आहे. यानंतर संशोधन झालेली अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय Brimodine, Dorsolamide, Acetozolamide, Manitole हे इंजेक्शन तातडीच्या उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णात वापरता येते, असे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. गायत्री खोत यांनी सांगितले.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.