Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नगरसेवकांमुळेच मनपा क्षेत्राचा विकास आमदार सुधीर गाडगीळ..

भाजप नगरसेवकांमुळेच मनपा क्षेत्राचा विकास आमदार सुधीर गाडगीळ..


प्रभाग ८ मधील ५० लाखांच्या कामांचा शुभारंभ

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचा चौफेर विकास होत आहे. अनेक योजना, प्रकल्प मार्गी लागले आहेत. भाजप नगरसेवकांचा यामध्ये सिहांचा वाटा आहे असे गौरवोद्गार आमदार सुधीर गाडगीळ यांनी काढले. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सागरे यावेळी उपस्थित होत्या.

आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी ज्या विश्वासाने भाजप नगरसेवकाना निवडून दिले आहे. त्या विश्वासाला तडा न जाऊ देता नगरसेवक काम करत आहेत. पथदिवे, रस्ते, गटारीसह मूलभूत विकासकामे मार्गी लागली आहेत. सुरवातीला प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरविकास योजने अंतर्गत विजयनगर पुर्व मगदूम सोसायटी मधील घरपट्टी ऑफीस येथील चंदनशिवे घर ते निकम घर पर्यंत रस्ता करणे (३५ लाख) तसेच नगरसेविका सोनाली सागरे यांच्या निधीमधून बंदिस्त गटर व अंतर्गत रस्ते करणे (१५ लाख) असे ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोविंद धुमाळसर, चव्हाण काका, पाटील काका, एम एच पाटीलसर, उदय पवार, अरविंद देशमुख, राजू मगदूम, अनंत देसाई, माजी नगरसेवक दीपक वायदंडे, महेश सागरे, सायगावे काका यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.