Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका..

जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका..


सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. आत्मविश्वास नसलेलं, हे सरकार असून बरखास्त होणार असल्याने अर्थसंकल्पात आभाळभर घोषणा करण्यात आल्या आहेत, मात्र यातलं काहीच होणार नाही. देव देखील यांच्या नावाने ठणा ठणा करतील, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते सांगलीच्या बेडग येथील एका सभेत बोलत होते.

भाजप सरकारवर टीका करताना जयंत पाटील यांनी, पुढच्या फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागतील आणि धाडस केलं तर विधानसभेच्या निवडणुकाही होतील. पण हे सरकार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका घ्यायला घाबरले आहे.  मुंबईत तर जिकडे-तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नमस्कार करत असलेले फलक झळकत आहेत. ज्यावेळी माणसाचा आत्मविश्वास कमी होतो आणि सारखे लोकांच्या समोर पाहिजे असे होतो. असे आत्मविश्वास नसलेले सरकार महाराष्ट्रात काम करत आहे, अशी टीका जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

सरकार बरखास्तच करायचं असेल आणि विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या असतील, तर घोषणा करायला काय बिघडतं. त्यामुळे या सरकारने अर्थसंकल्पामध्ये आभाळा एवढ्या घोषणा केल्या आहेत. पण आभाळभर घोषणा करताना खिशात पैसे नाहीत. याचे कसले ही तारतम्य सरकारला राहिले नाही. या घोषणा करताना राज्यातले एकही देवस्थान सोडले नाही. सगळ्या देवस्थानांना पैसे दिले आहेत. पण पैसे देणारच नाही, त्यामुळे देव देखील यांच्या नावाने ठणा ठणा करतील, असा टोला जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.