Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत येथे पाण्यावरून वादात दोघांचा खून..

जत येथे पाण्यावरून वादात दोघांचा खून..


जत: जत तालुक्यातील कोसारी येथे विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून भावकीतीलच लोकांमध्ये झालेल्या हल्ल्यात चुलते-पुतणे जागीच ठार झाले तर चौघेजण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. विलास नामदेव यमगर (वय 45), प्रशांत दादासो यमगर (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. तर दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर व एक महिला यामध्ये जखमी झाली आहे. चौघांवर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलीस फाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोसारी पासून पाच किलोमीटर अंतरावर महानोरवाडी येथे यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाल्याचे समजते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यमगर यांच्या भावकितीलच संशयित दहा ते बारा हल्लेखोरांनी या कुटुंबावर तलवार, चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. यात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. घटनेनंतर संशयित पळून गेले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.