Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन् विराट कोहलीचं नाव घेताच स्मृती मंधाना भडकली..

अन् विराट कोहलीचं नाव घेताच स्मृती मंधाना भडकली..


नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच 'महिला प्रीमियर लीग'च्या पहिल्या सत्रासाठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रकही जाहीर केले होते. महिला प्रीमियर लीगच्या या पहिल्या सत्रात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने 23 दिवसांच्या कालावधीत खेळवले जातील. मुंबईचे डी.वाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 11-11 सारखेच सामने होतील. तर, 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.

दरम्यान, महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना 5 मार्च रोजी नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला होता. त्यानंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमने सामने आले होते. यावेळी या दोन संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली होती.

स्मृती मंधाना महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या एडिशनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटची ‘ब्यूटी क्वीन’ अशी देखील तिची ओळख असली तरी, नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत विराट कोहलीचं नाव निघताच स्मृती मंधाना भलतीच संतापल्याचे दिसून आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि विराट कोहली हे नातं फारच जुनं आहे. त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मध्ये एखाद्या नव्या खेळाडूचा प्रवेश होतो, तेव्हा विराटचं नाव हमखास समोर येत. आणि असंच काहीसं आता देखील घडल्याचं दिसून आलं आहे.

यावेळी स्मृती मंधानाची तुलना विराट कोहलीशी करण्यात आली होती. यावेळी बोलताना स्मृती मंधाना संतापली आणि म्हणाली, “मी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आहे आणि याचा मला निश्चितच अभिमान आहे. पण, कर्णधार हा संघाचा नेता असतो. तसंच, विराटशी जर माझी तुलना होत असेल तर ते मला अजिबात आवडत नाहीये. माझी विराट कोहलीशी तुलना योग्य नाही. कारण विराट कोहलीने आतापर्यंत जे काही मिळवले ते अद्वितीय आहे. मला आशा आहे की.. मी त्या पातळीपर्यंत पोहोचू शकेन…’ असं ती यावेळी म्हणाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.