Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोव्याला फिरायला गेलेल्या कुटुंबावर तलवारीने हल्ला..

गोव्याला फिरायला गेलेल्या कुटुंबावर तलवारीने हल्ला..


मुंबई : गोव्याला फिरायला गेलेल्या एका कुटुंबियावर पाच लोकांनी हल्ला केला होता. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. त्यापैकी एकजण फरारी होता. त्याला गोवा पोलीसांनी नुकतीच अटक केली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी एका कुटुंबियावरती जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर संपुर्ण गोव्यात या प्रकरणाची चर्चा सुरु होती. त्यापैकी एक आरोपी फरार झाला होता. परंतु पोलिसांनी त्या आरोपीला सुद्धा अटक केली आहे.

जतिन शर्मा यांनी व्यक्तीने या प्रकरणी गोवा पोलीसांना या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यावेळी हॉटेलमधील चार लोकांना पोलीसांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ट्विट केल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी निंदा केली होती. त्याच बरोबर हे सगळं चुकीचं असून आरोपींवरती कडक कारवाई करावी असं देखील म्हटलं आहे.

पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गोव्याच्या पोलिसांनी काल या प्रकरणातील फरारी आरोपीला पणजी-मापुसा राजमार्ग इथून ताब्यात घेतलं आहे. काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अंजुना पुलिस ठाण्यात त्या आरोपीला आणण्यात आलं होतं. दिल्लीहून गोव्याला फिरायला कुटुंबियांवरती पाच जणांनी चाकू आणि तलवारीने हल्ला केला होता. पीडीत लोकांनी सांगितलं की, समुद्राच्या किनारी एका हॉटेलमध्ये ते राहिले होते. ज्यावेळी त्या कुटुंबियावर हल्ला झाला, त्यावेळी त्या कुटुंबियांनी हॉटेलच्या मालकाला आणि इतर कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली होती.

पोलिसांनी सांगितलं की, पाच लोकांनी मिळून हल्ला केला होता. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर चार लोकांना तिथून ताब्यात घेतलं होतं, तर एकजण फरारी होता. काल पाचव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.