Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मरावे परी ‘पुस्तक रुपी’ उरावे या उक्तीप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक स्व. जे. बी. पाटील यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या वाचन संग्रहातील दोन लाखाहून अधिक किंमतीची ‘ग्रंथभेट’

मरावे परी ‘पुस्तक रुपी’ उरावे या उक्तीप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक स्व. जे. बी. पाटील यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या वाचन संग्रहातील दोन लाखाहून अधिक किंमतीची ‘ग्रंथभेट’


सांगली :
समाज सुधारणांच्या क्षेत्रात पायाभूत मांडणी करणारे आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याची रचना करणारे ज्येष्ठ समाजसेवक, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट सांगलीचे तात्कालीन मॅनेजिंग ट्रस्टी स्व. जे. बी. पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या वाचन संग्रहातील दोन लाखाहून अधिक किमतीची दर्जेदार पुस्तकांची भेट सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या ग्रंथालयांना सांगलीमध्ये संपन्न झालेल्या स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार २०२३ च्या समारोहाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र व ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी सुदर्शन पाटील यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे ऑन. सेक्रेटरी सुरेश पाटील, ट्रस्टी जयश्री पाटील, प्रमोद पाटील, तसेच डॉ. दिलीप शिंदे व संस्थांच्या ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्व. जे. बी. पाटील यांनी कुपर कॉर्पोरेशन प्रा. लि. सातारा, वालचंद नगर इंडस्ट्रीज, कमिन्स इंडिया प्रा. लि. येथे व्हा. प्रेसिडेंट तसेच लठ्ठे सोसायटीचे गव्हर्निग कौन्सिल मेंबर म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी संपूर्ण हयातीत अनेक दर्जेदार पुस्तकांची खरेदी करून, वाचन करून संग्रही ठेवली व स्वतःचे ग्रंथालय तयार केले. त्यांनी सातारा, सांगली येथील जिल्हा कारागृहातील बंदीच्या विचारांना सकारात्मक चालना, प्रेरणा मिळावी त्यांच्या ज्ञान, माहितीमध्ये वाढ व्हावी. तसेच त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहिल या उद्दात हेतूने ‘बंदी सुधारणा केंद्र’ अंतर्गत ग्रंथालयाची स्थापना केली. 

स्व. जे. बी. पाटील यांची इच्छा होती की मरणोप्रांत संग्रही असलेले पुस्तके सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक दृष्ट्या कार्य करणाऱ्या संस्थांच्या ग्रंथालयांना भेट दिली जावीत. त्यांची ही इच्छा या पुरस्कार समारंभाचे औचित्य साधून त्यांची जवळपास दोन लाखाहून अधिक किमतीची दर्जेदार जवळपास 500 हून अधिक पुस्तके ज्यामध्ये डॉ. बाबा आमटे, डॉ. अब्दुल कलाम, शिवचरित्र, मृत्युंजय, ययाती, यू कॅन विन, आय एम मलाला, द लाइफ ऑफ गांधी तसेच विविध वैचारिक, अध्यात्मिक, प्रेरणादायी, सामाजिक, आत्मचरित्र, समीक्षा ग्रंथ, व्यक्तिचित्रे अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके सांगली जिल्हा कारागृह येथील बंदी सुधारणा केंद्र, राजमती सार्वजनिक ग्रंथालय, संवेदना वृद्धसेवा केंद्र, श्रीमती इंदिरा बाबगोंडा विकास ग्रंथालय, जी. ए. कॉलेज, एन.एस.लॉ. कॉलेज, एन.डी.पाटील नाईट कॉलेज, कस्तुरबा वालचंद कॉलेज, ए.बी.पाटील इंग्लिश स्कूल या शैक्षणिक व सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.