Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, पती-पत्नीसह पाच जनांचा होरपळून मृत्यू..

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, पती-पत्नीसह पाच जनांचा होरपळून मृत्यू..


उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीणमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका घराला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे एका झोपडीला ही आग लागल्याचे बोलले जाते. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. ही घटना रुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरमाऊ बंजाराडेरा गावात घडली. या घटनेत एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली असून, या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा आणि डीएम, एसपीही घटनास्थळी पोहोचले. पोलीस फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनेसंदर्भात तपास करत आहे.

बोलले जात आहे की, गावचे रहिवासी सतीश कुमार हे आपली पत्नी काजल आणि 3 चिमुकल्यांसह झोपडीत झोपले होते. या झोपडीला रात्री उशिरा अचानकपणे आग लागली. यानंतर एकच आरडा-ओरड सुरू झाली. आरडाओरडा ऐकून गावकरी आग विझविण्यासाठी धावले. गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. यातच हे कुटुंब जिवंत जळाले.

या घटनेत सतीश यांची वृद्ध आई रेश्मा याही गंभीर हित्या भाजल्या आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना रुग्णालयात उपस्थित असलेले गावातील उदयपाल यांनी सांगितले की, सतीश पत्नी आणि मुलांसह झोपला होता. याचवेळी रात्री उशिरा छपरावरील लाईटमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि ही आग लागली. जिल्हाधिकारी नेहा जैन यांनी जखमी महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेली त्यांनी डॉक्टरांना जखमी महिलेवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ही आग कशामुळे लागली, याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.