Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले?

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले?


शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर अजून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान, मटण थाळीचा एक व्हिडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केले. आधी महादेव मंदिरात आणि सासवडला सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले, असे शिवतारे म्हणाले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली असून सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.

आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले, असे विजय शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी 'येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला || अशा अभंगाची पोस्ट शिवतारे यांनी फेसबुकवर केली आहे. यामुळे आता सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे काल पुण्याच्या दौऱ्यावर होत्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.