Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांचे कौतुक करत रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा

शरद पवारांचे कौतुक करत रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभेतून एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपवर निशाणा साधला. आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना रामदास कदम यांनी,"आहो, उद्धवजी तुम्ही मला सांगा, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात प्रचंड वादळं आली. कोकणाची किनारपट्टी सगळी उद्धवस्त झाली. तेव्हा शरद पवारांसारखा ८२ वर्षांचा वयस्कर माणूस चार दिवस कोकणाला न्याय देण्यासाठी आला. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे नेतेही आले. तेव्हा तुम्ही बापलेक आलात का? का आला नाहीत?"असा सवाल

उद्धव ठाकरेंना उद्देशून रामदास कदम यांनी, "काल तुम्ही म्हणाले, कोकण माझा बालेकिल्ला आहे. पण कोकणचा माणूस अडचणीत होता. माझा मच्छिमार अडचणीत होता. तेव्हा तुझा कोकण कुठे गेला होता रे बाबा. तेव्हा योगेश कदम याने पुढाकार घेतला. मी स्वत: अजित पवारांना फोन केला. केंद्र सरकारचे निकष बदलून वादळात अडकलेल्या मच्छिमारांना आम्ही बापलेकांनी मदत केली. योगेश कदम रात्रंदिवस काम करत होता. मी आजारी असतानाही दापोलीत येऊन बसलो होतो. तेव्हा तुम्ही बापलेक कुठे होता?"असे म्हटले.

"जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि नेता बाहेर. हे पहिल्यांदा घडलं असेल. तुम्ही तुमची हौस भागवून घेत आहात काय? कोकणातील लोकांना भावनात्मक आवाहन करायचं थांबवा. आता हळुहळू महाराष्ट्राच्या जनतेलाही उद्धव ठाकरे काय आहेत, हे समजेल," अशा शब्दांत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.