Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुठले पत्रकार खरे, कुठले खोटे?

कुठले पत्रकार खरे, कुठले खोटे?

सांगलीतील काही चॅनेलच्या पत्रकार मित्रांनी युट्युबच्या पत्रकारांना खोटे पत्रकार ठरवले असे ऐकले. त्यांनी पोलीस अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना तक्रार केली आणि ते म्हणे न्याय करणार आहेत? मुळात अजून केंद्र सरकारने युट्युबला खोटे, बोगस असे काही ठरवलेले नाही. उलट त्यांची नोंदणी करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. पाच-सहा वर्षांपूर्वी चॅनेलच्या अनेक पत्रकारांबद्दल प्रिंटचे काही ज्येष्ठ पत्रकारही असेच खोटे, बोगस काहीही न येणारे असे म्हणायचे. 

आता ते चॅनेलचे पत्रकार जर युट्युबवाल्यांना खोटे, बोगस म्हणत असतील तर मित्रांनो तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे. दैनिकातील नोकरी सोडलेले अनेक पत्रकार आणि चॅनेल मधून काढलेले सुद्धा अनेक पत्रकार यूट्यूब चैनल चालवतात.  तेव्हा सामंजस्याने घ्या. एका अधिकाऱ्याने युट्युब वाल्यांना बोगस ठरवण्याचा प्रयत्न केला त्याला चांगलेच भोवले आहे. तुमच्यामुळे अधिकाऱ्यांना गोत्यात आणू नका आणि कोणी कोणाला बोगस ठरवायच्या भानगडीत पडू नका. आणि अधिकाऱ्यांना ही विनंती, आमच्या लोकांच्या भांडणात तुम्ही पडू नका.


शिवराज काटकर

तुमचाच पत्रकार मित्र


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.