Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा, तासाभरात जामीनही मंजूर..

आमदार बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा, तासाभरात जामीनही मंजूर..


आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडूंना तब्बल २ वर्षांची शिक्षा सुनावली. २०१७मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्तावर हात उगारला होता. याप्रकरणी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक करणे, यासाठी कलम ३५३ अन्वये दोन वर्षाची शिक्षा सुनावली. अवघ्या काही तासांमध्ये त्यांना जमीनही मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. २०१७मध्ये दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, यावरून आमदार बच्चू कडूंनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. तसेच शिवीगाळही केली होती. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि बच्चू कडू यांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.