Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी डॉ. वैभव पाटील यांची नियुक्ती

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी डॉ. वैभव पाटील यांची नियुक्ती 


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी डॉ. वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी या नियुक्तीचे आदेश काढले. नियुक्तीआदेश मिळतात डॉ. वैभव पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

यापूर्वीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे रिक्त पदावर डॉ. वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. वैभव पाटील हे 2004 साली महापालिका सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांची महापालिकेतील सेवा 19 वर्षे झाली आहे. कोविडच्या कालावधी पासून ते नोडल ऑफिसर म्हणून उत्कृष्ट काम पाहत होते. याचबरोबर त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या समन्वयक पदाची जबाबदारीसुद्धा होती. 

आज वैभव पाटील यांनी आरोग्य विभाग मुख्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना वैभव पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्याबरोबर आरोग्य विभागाच्या कारभारात पारदर्शकता राखली जाईल असे सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.