मजरेवाडी खून प्रकरणी कर्नाटकातील महाराजासह तिघेजण ताब्यात
कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील सावकार देबाजे खून प्रकरणी कर्नाटकातील एका महाराजासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुरुंदवाड पोलिस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
सावकार देबाजे याची धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहाच्या खिशातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये शेवटचे संभाषण झालेल्या नागराळ (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील महाराजाला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर आज बुधवारी सकाळी आणखीन दोन संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या खून प्रकरणात आणखीन काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली असून कर्नाटक राज्याकडे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.