Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यधुंद तरूणाने शोले स्टाइल आत्महत्येचा केला प्रयत्न

मद्यधुंद तरूणाने शोले स्टाइल आत्महत्येचा केला प्रयत्न 



सांगली : शहरातील विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाश पाठीमागे असलेल्या एका अपार्टमेंटवर चढून एका तरुणाने शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणाने कौटुंबिक वादातून हा प्रकार केला. पाऊण तासाहून अधिक वेळ त्याचा हा 'ड्रामा' सुरू होता. अखेर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आले. सुनील रतनलाल प्रजापती (वय ३०) असे त्याचे नाव आहे.

गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाशच्या पाठीमागे आर्यन अपार्टमेंट आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रजापती याचा घरी वाद झाल्यानंतर तो अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर चढला. कठड्यावर उभा राहून तो ओरडत होता. विश्रामबाग पोलिसांना ही माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून त्याची समजूत काढत खाली येण्याचे प्रयत्न करण्यात आले. तोवर अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार जवानही अपार्टमेंटजवळ दाखल झाले. पाऊण तासाहून अधिक काळ त्याचा शोले स्टाईल ड्रामा सुरू होता.

अखेर अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते रवी खराडे त्याच्या नकळत त्याच्याजवळ पोहोचले. त्यांनी त्याला पकडून खाली उतरवले. अग्निशमन दलाचे विजय कांबळे, प्रसाद माने, अभिजित पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

रखवालदाराच्या जावयाचा प्रताप 

दारू पिऊन धिंगाणा घालणारा सुनील प्रजापती हा याच अपार्टमेंटमध्ये रखवालदार म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जावई आहे. प्रजापती व त्याची पत्नी तेथेच राहण्यास आहेत. घरगुती वादानंतर दारू पिऊन आल्यानंतर त्याने हा प्रकार केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.