मोठा गाजावाजा करत सांगली दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बैठकांचा शो फ्लॉप
सांगली दिं.२१: मोठा गाजावाजा करत सांगली दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बैठकांचा शो फ्लॉप झाल्याचे दिसून आले. मॅरेथॉन बैठका मुळे दुपारी दोन वाजता बोलविलेल्या पत्रकार बैठक चार वाजेपर्यंत होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर काही पत्रकारांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.
जिल्ह्यातील सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या दृष्टीने अडचणीत असल्याचा आलेल्या अहवालावर सांगली जिल्ह्याची जबाबदारी असणारे भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सांगली जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यावर आले.शहरातील अलिशान हॉटेल मध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला.यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघ अडचणीत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले.हा मतदारसंघ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल यावर राणे यांनी चाचपणी केली. या बैठकीला विद्यमान खासदार संजय पाटील,पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर,मंकरद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, उपस्थित होते.सांगली लोकसभेप्रमाणेच सांगली विधानसभा मतदारसंघ हाही भाजपच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचा अहवाल भाजपला प्राप्त झाला आहे त्यावरील आजच्या बैठकीत चर्चा झाली विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे विशिष्ट वर्तुळा बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सलग दोन वेळा सांगली मतदार संघात भाजपाला चांगलं यश मिळूनही ही जागा धोक्यात येणे हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत कमीपणाचे मानलं जात आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
भाजपाच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता ,मात्र बैठकांच्या घाईगडबडीमुळे हा फ्लॅप शो ठरला. पत्रकार परिषदेसाठी रितसर निमंत्रण देऊन तब्बल दोन तास पत्रकारांना ताटकळत ठेवले.त्यामुळे पत्रकारांनी बहिष्कार घातला. शिस्तबध्द म्हणवून घेणाऱ्या भाजपाच्या या बेशिस्तीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.