पलूस बाजार समिती बिनविरोध होणार की कॉंग्रेसला लढावी लागेल?
पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी उमदवारांची अर्ज मागे घेण्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस उरला आहे. यामध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष गोष्ट म्हणजे, यावेळची निवडणूक होणार की, प्रथेप्रमाणे ती बिनविरोध होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत. इथे शेवटच्या क्षणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून निवडणूक बिनविरोध होऊन, याठिकाणी कॉंग्रेस पक्षाची सत्ता कायम रहाते. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, (जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या नेतृत्वात पहिल्यापासूनच काँग्रेस पक्षाची बाजार समितीमध्ये सत्ता आहे. गेल्या वेळी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व ईतर पक्षांनी निवडणूक नको म्हणून तडजोड केली होती.पलूस तालुक्यात कॉंग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीनही पक्षांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.स्वाभिमानीसह काही संघटनांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूण १८ जागांसाठी तब्बल १३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत फक्त एकच उमेदवारी अर्ज मागे घेण्यात कॉंग्रेस नेत्याचा समावेश असलेली चार पक्षांची वज्रमूठ, सुनील केदारांना शह देणार का?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे बाजार समितीत काँग्रेस काही राजकीय तडजोडी करणार का? याकडेही लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी व भाजपची अंतिम भूमिका काय असणार? बिनविरोधसाठी प्रयत्न होणार की, काही वेगळ्या घडामोडी घडणार, हे ही महत्त्वाचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.