सांगलीत महिलेचा निघृर्ण खून..
घरजागेच्या वादातून घटना तिघांवर संशय एका अल्पवयीनाचाही समावेश
सांगली: शहरातील वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात एका महिलेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी वार करून तिचा निघृर्ण खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान घरजागेच्या वादातून भावकीतीलच तीन तरूणांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशीरापयर्त याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संगीता राजाराम मासाळ (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता यांच्या पतीचे काही वषार्पूवीर् निधन झाले आहे. मासाठ कुटुंब मूळचे जत तालुक्यातील बाज येथील आहे. ते गेल्या कित्येक वषार्पासून सांगलीत वानलेसवाडी येथे स्थायिक झाले आहेत. संगीता यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. मुलगा किरण हा त्यांच्यासमवेत रहात असून तो अद्याप अविवाहीत आहे.
संगीता यांच्या भावकीतीलच काही लोक वानलेसवाडी येथे त्यांच्या घराजवळ राहण्यास आहेत. वानलेसवाडी येथील जागेवरून त्यांचा भावकीतील लोकांशी काही महिन्यांपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी संगीता यांचा मुलगा किरण जेवण करून घराबाहेर गेला होता. त्यावेळी संशयित त्यांच्या घरी आले. संगीता जेवण करत असताना हल्लेखोरांनी कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. संगीता यांच्या मान, डोके, चेहऱ्यावर गंभीर वार झाले. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. यावेळी हल्लेखोरांनी घटनास्थळीच हल्ल्यातील कोयता फेकून दिला होता.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरापयर्त विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
