सांगली, पलूस, मिरजेसाठी ४० कोटींचा निधी मंजूरजनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची माहिती
सांगली: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगली शहरासाठी वीस कोटी, मिरजेसाठी १७.५० कोटी तर पलूससाठी अडीच कोटी असा चाळीस कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्य शासनाने जनसुराज्य शक्ती पक्षाससह सवर्च घटक पक्षांचा योग्य सन्मान केला असल्याचे मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समित कदम म्हणाले, सांगली-कुंडल राज्य मागार्वरील नावरसवाडी ते कनार्ळ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. सांगलीवाडी टोल नाका ते राज्य मागर् क्रमांक ६०, राज्यमागर् क्रमांक १५२ अ ची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रूपये मंजूर केले आहेत. सांगलीतील विश्रामबाग ते होंडा शोरूम या रस्त्यासाठी १० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. कळंबी-मालगाव-आरग रस्ता सुधारणेसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सांगली, मिरज शहरासाठी येत्या सहा महिन्यात भरघोस निधी खेचून आणू. त्यामुळे या दोन्ही शहरात चांगल्या सुधारणा होतील. सांगली, मिरज या दोन्ही शहरात बाहेरून येणारे रस्ते, जोडरस्ते चांगेल होतील असा विश्वासही समित कदम यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे प्रदेश कायर्कारिणी सदस्य शेखर इनामदार, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, महापालिका स्थायी समिती सभापती धीरज सूयर्वंशी, महादेव कुरणे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.