बापाने कमवले पोराने गमावले!
ज्याच्या अभिनयाचे साऱ्या जगभर चाहते आहेत अशा जॅकी चॅनची गोष्टच वेगळी आहे. केवळ चीनमध्येच नाहीतर हॉलीवूड, बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये त्याच्या चित्रपटांचा मोठा वाटा आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत या अभिनेत्यानं प्रेक्षकांची मोठी वाहवा मिळवल्याचे दिसून आले आहे. अतिशय गरिबीत बालपण गेलेल्या जॅकी चॅननं पुढे कष्टाच्या जोरावर अमाप संपत्ती मिळवल्याचे दिसून आले.
यशाच्या कारकीर्दित असणाऱ्या जॅकी चॅननं त्याच्या स्वभावानं मोठा मित्र परिवार गोळा केला आहे. भारतातील कित्येक सेलिब्रेटी त्याचे चाहते असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडची प्रसिद्घ अभिनेत्री मलायका शेरावतनं त्याच्या द मिथ नावाच्या चित्रपटामध्ये मोठी भूमिका केली होती. आज जॅकी चॅनचा जन्मदिवस यानिमित्तानं त्याच्या विषयीच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.जॅकीच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगानं त्याला सर्वात मोठा धक्का बसला होता ज्यावेळी त्याच्या मुलानं त्याचा विश्वासघात केला होता. मला माझ्या मुलाची लाज वाटते असे जॅकी चॅननं सांगितले होते. तो मुलावर भयंकर संतापलाही होता. त्याचे कारण मुलाकडे ड्रग्ज आढळून आले होते. पोलिसांनी ही माहिती जॅकी चॅनला दिल्यानंतर त्यानं रितसर मुलावर जी कारवाई करायची ती करा असे सांगून एक वेगळा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला होता.जॅकी चॅनला त्या प्रसंगानं खूप अस्वस्थ केलं होतं. काही जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील त्यानं त्याविषयी सांगून आपण किती कणखर आणि शिस्तप्रिय आहोत हे सांगितले होते. मला माझ्या मुलानं जे काही केलं त्याची लाज वाटते. त्याच्याकडून जे काही घडले त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. असे जॅकी म्हणाला होता. चाहत्यांनी देखील त्याला उदार मनानं माफ केले होते. जॅकीच्या मुलाला आपल्या वडिलांकडून काही गोष्टी आवर्जुन शिक. असा सल्ला द्यायला विसरले नाहीत.
२०१४मध्ये जॅकी चॅनचा मुलगा जायसी चॅनला चीन पोलिसांनी ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक केली होती. जायसी चॅजनकडे जवळपास १०० ग्रॅम गांजा अढळला होता. त्यावेळी तो ३२ वर्षांचा होता. यासगळ्यात जायसी चेनला या प्रकरणी सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
