खटावचे विस्तार अधिकारी 12 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले
विरोधात आलेल्या तक्रारीवरुन कारवाई न करण्यासाठी ग्रामसेवकांकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना खटाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ग्रामसेवक आहेत. त्यांच्या विरोधात विस्तार अधिकाऱ्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींवरुन विस्तार अधिकारी संजय सोनावले हे तक्रारदाराना मानसिक त्रास देत होते
कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवून निलंबित करेन असे धमकावत होते. एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी विस्तार अधिकारी सोनावले यांनी ग्रामसेवकाकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ती स्वीकरताना विस्तार अधिकारी सोनावले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती उज्वला वैद्य, पोलिस नाईक प्रशांत नलावडे, तुषार भोसले, निलेश चव्हाण, मारुती अडागळे यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.