Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

15 तोळे सोने फक्त आणि फक्त 70 हजारात; सोने म्हणून दिले......

15 तोळे सोने फक्त आणि फक्त 70 हजारात; सोने म्हणून दिले......


पिंपरी : तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने अवघ्या काही रोख रकमेच्या बदल्यात देतो ,असे सांगून ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन ६५ वर्षीय महिलेची फसणूक केली. ही घटना सोमवारी (दि.१५) भोसरी येथे घडली. या प्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या भावाकडे जाण्यासाठी चाकण बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळ अनओळखी दोघे जण आले. त्या दोघांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेच्या बदल्यात पंधरा तोळे सोन्याची बिस्कीटे देतो असे सांगितले. फिर्यादी यांच्याकडील ७० हजार ३०० रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम आरोपींनी घेत त्यांना सोन्याची बिस्कीटे दिली. मात्र, फिर्यादी यांनी नंतर या बिस्किट नीट पाहिली असता ती सोन्याची बिस्कीटे नव्हती पिवळ्या रंगाच्या धातुला सोन्याची बिस्कीटे म्हणून आरोपींना दिली हे लक्षात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.