अबब चक्क एकाच आंब्याची किंमत 19000 रूपये; या सिक्रेट पद्धतीने तयार होतो
टोकियो : आंब्याचे बरेच प्रकार आहे. तुम्ही किती तरी प्रकारचे आंबे खाल्ले असतील. आंब्याच्या प्रकारानुसार त्यांची किंमतही असते. पण एखादा आंबा फार फार तर किती महाग असेल. तुम्हाला किंमत वाचूनच धक्का बसेल. हा एक आंबाच 19 हजार रुपयांचा आहे. जपानच्या सर्वात उत्तरेकडील बेटावरील बर्फाळ प्रदेशात हा आंबा पिकवला जातो. सिक्रेट पद्धतीने या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं.
62 वर्षांचे हिरोयुकी नाकागावा जपानच्या होक्काइडो बेटावरील ओटोफुके येथील त्याच्या शेतात ग्रीनहाऊसमध्ये हे आंबे पिकवतात. शाश्वत शेतीच्या प्रयोगातून एक दिवस जगातील सर्वात महागडा आंबा मिळेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पूर्वी पेट्रोलियम कंपनी चालवणारे नाकागावा म्हणतात, "होक्काइडो इथून मला निसर्गातून काहीतरी नैसर्गिक बनवायचं होतं. सुरुवातीला कोणीही मला गांभीर्याने घेतलं नाही." ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नाकागावा 2011 पासून जपानच्या उत्तरेकडील बेटावरील बर्फाळ टोकाची प्रदेशात आंबा पिकवत आहे.हा प्रति आंबा $230 या भावाने विकतो. मे महिनाच कशाला, वर्षभर आंबे खायला मिळतील; एकदा हा पाहाच मियाझाकीच्या दक्षिणेकडील प्रांतातील आणखी एका आंबा शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, ज्याने हिवाळ्याच्या महिन्यांत फळं पिकवणं शक्य असल्याचा दावा केला होता. नाकागावाने त्याचं फार्म तसंच त्याचा स्टार्टअप नोरावर्क्स जपानची स्थापना केली. काही वर्षांनंतर त्याने त्याच्या आंब्याचा ब्रँड हाकुगिन नो तैयो म्हणून ट्रेडमार्क केला, ज्याचा अर्थ बर्फात सूर्य असा होतो.होक्काइडो बर्फ आणि गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. नाकागावा या दोन नैसर्गिक संसाधनांचा वापर करतात. हिवाळ्याच्या महिन्यांपासून बर्फ गोळा करतात आणि उन्हाळ्यात त्याचा हरितगृह थंड करण्यासाठी वापरत करतात. मग हिवाळ्यात ते हरितगृह गरम करण्यासाठी नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांचा वापर करतात आणि हंगामाशिवाय सुमारे 5,000 आंबे उत्पादित करतात.
या प्रक्रियेमुळे थंडीच्या महिन्यांत आंबे पिकवण्यास मदत होते. होक्काइडोच्या कमी-आर्द्रतेच्या हवामानामुळे बुरशी काढून टाकणाऱ्या रसायनांची गरजही कमी होते. आंब्याची कोय फेकायची नाही तर खायची असते; पण कशी ते पाहा हा आंबा सामान्य आंब्यापेक्षा खूपच गोड आणि रसाळ असल्याचा दावा नाकागावा करतात. 2014 मध्ये डिपार्टमेंटल स्टोअर Isetan ने टोकियोमधील शिंजुकू स्थानावर त्याचा एक आंबा विक्रीसाठी ठेवला आणि तो सुमारे $400 मध्ये विकला. नाकागावाच्या क्लायंटमध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट महिला शेफ नत्सुको शोजीसारख्या रेस्टॉरंटचा समावेश आहे, जी तिच्या मँगो फ्लेव्ह केकमध्ये फळं वापरते. त्यांचे परदेशातही ग्राहक आहेत आणि ते त्यांचे आंबे हाँगकाँगमधील सिटीज सुपर सारख्या उच्च श्रेणीतील किरकोळ विक्रेत्यांकडे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.