Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंढरपूरवरून परतताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात 3 जण ठार

पंढरपूरवरून परतताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात 3 जण ठार


बुलडाणा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक अपघाताची घटना शेगाव शहरामध्ये घडली आहे. शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या पिलरवर कार धडकून भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे.

हे सगळे भाविक पंढरपूरवरून विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर सात भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?

बुलडाणा जिल्ह्यातील काही भाविक हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यान दर्शन करून परतत असताना शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या पिलरला भाविकांची कार धडकली आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन भाविक जागीच ठार झाले आहेत. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चालकाला झोप लागल्यानं अपघात

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.