Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून एका तोतयानं देशातील 6 भाजप आमदारांना गंडा घातला

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून एका तोतयानं देशातील  6 भाजप आमदारांना गंडा घातला 


नागपूर: भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून एका तोतयानं देशातील सहा भाजप आमदारांना गंडा घातला आहे. या आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. नीरज राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून ताब्यात घेतलं आहे. जेपी नड्डा यांचा खराखुरा पीए असल्याचं पटवून देण्यासाठी आरोपी नीरज आपल्या एका साथीदाराला फोन करून बोलंण करून द्यायचा.

अशी झाली भांडाफोड भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून निरजने भाजपच्या तब्बल सहा आमदारांना गंडा घातला आहे. आरोपी पैशांची मागणी करताना मंत्रिमंडळ विस्तारात चांगला पोर्टफोलियो मिळवून देण्याचं आश्वासन देत होता. तसेच मंत्री बनण्यासाठी गुजरातमधील आरएसएसच्या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करण्याची मागणी तो करत होता. मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांना देखील या तोतया पीएने फोन करून मंत्रीपदाचे आमिष देत पैशांची मागणी केली होती.

मात्र तो पक्षनिधी आणि आरएसएससाठी पैेसे मागत असल्यानं आमदार विकास कुंभारे यांना संशय आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात समोर आलेलं प्रकरण पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. 'या' आमदारांची फसवणूक या तोतया पीएने आतापर्यंत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी, गोवा येथील प्रवीण आरलेकर, नागालँडचे आमदार बाषा मेवाचांग या आमदारांची फसवणूक केली आहे. आरोपी निरज राठोड याला पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून ताब्यात घेतलं आहे. त्याला पुढील तपासासाठी लवकरच नागपुरला आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.