माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता....विनेश फोगटच्या नव्या आरोपाने खळबळ
जंतर मंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंचा आंदोलन सुरूच आहे. आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेश फोगाटने बृजभूषण सिंह यांच्यावर नव्याने काही आरोप केले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत विनेशने तिला देखील इतर मुलींप्रमाणे इतके वर्ष सर्व गपचूप सहन करावं लागलं.
विनेशने वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जानेवारी महिन्यात बजरंग पुन्या, साक्षी मलिक आणि तिला जंतर मंतरवर प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना वाटले त्यावेळी दोन ते तीन दिवसात न्याय मिळेल. विनेश म्हणाली की, तिला वाटले नाही की महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे
न्याय नाही तर मग पदकं जिंकण्याला काय अर्थ नाही
विनेश फोगाट म्हणते की जर तुम्ही न्यायासाठी लढू शकत नाही तर मेडल जिंकण्याचा काय फायदा? आशियाई गेम्स जवळ आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचं आहे आणि पदक जिंकायचं आहे. मात्र ही एक मोठी लढाई आहे. तक्रार करणाऱ्या कुस्तीपटूंबद्दल विनेश म्हणाली की, लैंगिक शोषणाबाबत सारखं सारखं बोलणं खूप त्रासदायक असतं. त्यांना लैंगिक शोषणाबाबत कधी ओव्हरसाईट समिती, कधी पोलीस तर कधी भारतीय ऑलिम्पिक संघ समितीसमोर बोलावे लागते.
जंतर मंतर सोडणार नाही.
विनेश फोगाटने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले की, इतर मुलींप्रमाणे तिला देखील बृजभूषण सिंहांमुळे इतके वर्ष गपचूप सगळं सहन करावं लागलं. तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. विनेशने बृजभूषण शरण सिंह यांना इतके का वाचवले जात आहे असा प्रश्न देखील विचारला.कुस्तीपटूंनी आंदोलन सुरूच ठेवण्याबाबत विनेश म्हणाली की, जोपर्यंत बृजभूषण यांना अटक केली जात नाही तोपर्यंत ते जंतर मंजर सोडणार नाहीत. गेले काही महिने आमच्यासाठी तणावपूर्ण राहिले आहेत. त्यांना अश्रू ढाळले आहेत. मात्र आम्हाला माहिती आहे की महिलांना न्याय देण्यासाठी एक मोठी लढाई लढावी लागू शकते आणि त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास त्या तयार आहेत.विनेशने क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर देखील आरोप लगावले आहेत. त्यांनी कुस्तीपटूंचा अपमान केला आहे. विनेशने ज्यावेळी लैंगिक शोषणाची तक्रार क्रीडामंत्र्यांकडे केली, तिच्यावर काय परिस्थिती ओढवली हे सांगितले त्यावेळी त्यांनी डोळ्यात डोळे घालून याचे पुरावे मागितले. विनेश म्हणाली ओव्हरसाईट समितीच्या सदस्यांनी देखील असंच केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.