त्या इंजिनिअर तरुणीची हायफंडा लाइफस्टाईल थक्क करणारी
हेमा मीणा असं या तरुणीचं नाव आहे. या इंजीनिअर तरुणीने तिच्या फॉर्म हाऊसमध्ये एक स्पेशल रुम तयार केला होता. या रुममध्ये महागडी दारू आणि सिगारेट ठेवल्या होत्या. या तरुणीला महागड्या कारचाही शौक असल्याचं आढळून आलं. दोन ट्रकसहीत एक टँकर आणि महिंद्रा थारसह 10 वाहने या तरुणीकडे आढळून आल्या आहेत. केवळ 30 हजार रुपये पगार असतानाही या तरुणीकडे 30 लाख रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. तसे च 98 इंचाची टीव्हीही या तरुणीकडे आढळून आली आहे.
तक्रारीनंतर छापेमारी
हेमा मीणा हिच्या घर आणि फार्म हाऊसवरील छापेमारीचा हा दुसरा दिवस आहे. हेमा मीणाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
विदेशी श्वान आणि देशी गायी
बिलखिरिया येथील शेतात बंगला, फॉर्म हाऊस, लाखोंचे कृषी उपकरणे, परदेशी श्वान, डेयरी आदी संपत्ती तिच्याकडे आढळून आली आहे. या फार्महाऊसवर अनेक विदेशी श्वान आढळून आले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या 60 ते 70 गायी ही आढळून आल्या आहेत.
पूर्वी अशी परिस्थिती नव्हती
मीणा हिच्या घरी छापेमारी झाल्याने तिच्या संपत्तीची माहितीसमोर आली आहे. त्यावर आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. यापूर्वी मीणा कुटुंबाची परिस्थिती अशी नव्हती. काही वर्षातच त्यांची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलली आहे. असं काय झालं की तिची संपत्ती एवढी वाढली? असा सवाल शेजारीही करत आहे.
समितीची बैठक
मीणा हिच्याकडे 332 टक्के अधिक संपत्ती आढळली आहे. यात कृषीशी संबंधित अधिक उपकरणे आणि साहित्य आहे. तसेच आणखी तीन ठिकाणीही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. त्या ठिकाणीही काही गोष्टी सापडल्या आहेत. यासाठी लोक निर्माण विभागाने एक बैठक बोलावली आहे. यात इमारतीचं मूल्य ठरवलं जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.