यावर्षीही सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका
सध्याचा कोयना आणि वारणा या दोन्ही धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता यावर्षीही सांगली, कोल्हापूर शहरात मोठा महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत स्पष्ट इशाराच कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने महाराष्ट्र शासनाला दिला आहे.
कोयना, वारणा, अलमट्टी यासह सर्वच धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि विसर्ग यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या उच्चस्तरीय अधिकार्यांची तातडीची बैठक सांगलीमध्ये घ्यावी, अशी मागणी या समितीतर्फे करण्यात आली आहे. या समितीत निमंत्रक म्हणून सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ आणि प्रमोद माने यांचा समावेश आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वारणा धरणामध्ये 15 जूनअखेर जास्तीत जास्त 7 टीएमसी पाणी शिल्लक राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातून जाणार्या पाण्याचा विसर्ग राजापूर बंधार्यातून कर्नाटकात पुढे सोडला जातो. त्या ठिकाणी होणार्या विसर्गापेक्षा ज्यादा 30 हजार क्युसेक्स विसर्ग अलमट्टी धरणातून सोडला पाहिजे. तरच सांगली कृष्णा, पंचगंगा आणि वारणा काठावर महापूर येणार नाही. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उच्च स्तरीय अधिकार्यांची 1 जूनपूर्वी सांगलीत बैठक व्हावी. यावर्षी सांगली येथे बैठक घेऊन सर्व संबंधित धरणांचे परिचलन आणि विसर्ग याबाबत काही निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.