Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला


अमेरिकेतील नेवार्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळ झाला. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला पॅनीक अॅटॅक आला, त्यानंतर त्या प्रवाशाने गोंधळ घातला. यादरम्यान प्रवाशाने पत्नीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मात्र, क्रू मेंबर्सनी वाचवले. त्यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका व्यावसायिकाने नेवार्कहून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच गोंधळ सुरू झाला. यादरम्यान प्रवाशाने आरडाओरड करत फ्लाइट टेक ऑफ करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. जेव्हा क्रू मेंबर्स आणि त्यांच्या पत्नीने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.यावर क्रू मेंबर्सनी फ्लाईटमध्ये उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने प्रवाशावर जबरदस्ती केली आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर उतरले. गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला पॅनीक अटॅक येत होते आणि गेल्या काही दिवसांपासून तो त्याची औषधेही घेत नव्हता.

प्रवीण टोनेस्कर या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. प्रवीणने सांगितले की, विमानातील क्रू मेंबर्सनी उत्तम कामगिरी केली आणि मोठ्या कष्टाने विमानात उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने त्याला नियंत्रणात आणले. प्रवीण म्हणाले की, क्रू मेंबर्सनी खूप संयम दाखवला आणि अथकपणे या घटनेनंतर बाकीच्या क्रूची काळजी घेतली. एअर इंडियानेही प्रवीणच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून क्रू मेंबर्सचे कौतुक केल्याबद्दल प्रवीणचे आभार मानले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.