तुम्ही ज्याला पप्पू म्हणून संबोधला, तो तुमचा...; सुषमा अंधारेनी भाजपच्या जखमेवर चोळले मीठ
बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसला 124 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींचे कौतुक केले आहे. सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका करताना थेट मोदींवर निशाणा साधला आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले होते. मात्र भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच देशभरामध्ये 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणनारे लोक होते. त्या सगळ्या भक्तजनांसाठी चपराक आहे. पण असं म्हटल्यावर ज्यांची उमेद जात होती त्या सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे.
पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण अन् ऊर्जा निर्माण केली होती. त्याला सगळे कंटाळले आहेत. कर्नाटक मधील निकालाची विजयाची ऊर्जा हे महाराष्ट्रात दिसेल अशी आशाही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. काँग्रेसचा सावध पवित्रा; निकालाआधीच आमदारांबाबत महत्त्वाचा निर्णय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसणार नाही असं म्हटलं जात होतं.यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न आणि राहुल गांधीच काय तर नेहरू, गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पप्पू पास नही हो गया पप्पू मेरिट मे आ गया. चेहऱ्यावर तणाव, पराभवाचं टेन्शन, मुख्यमंत्री बोम्मई अखेर आले समोर सुषमा अंधारे यांनी भाजपवर धर्म आणि महापुरुषांवरून राजकारण केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, कधी धर्माच्या लोकांचा तर कधी महापुरुषाच्या लढायचं ही भाजपची भूमिका आहे. मात्र हा डाव सर्व लोकांना कळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.