Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वाभिमानीच्या लढ्याला यश

स्वाभिमानीच्या लढ्याला यश



बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे देण्याची तयारी, बेदाणा पेमेंट  उशिरा केल्यास दोन टक्के व्याज देण्याचा निर्णय, ५०० ग्रॅम पेक्षा जास्त तूट धरल्यास व्यापाऱ्यावर कारवाई होणार , बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे बैठकीत निर्णय बेदण्याचे पेमेंट २१  दिवसात न दिल्यास २ टक्के व्याज व्यापारी देणार, बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे देण्याची तयारी आणि ५००ग्रॅम पेक्षा जास्त तूट धरणाऱ्या व्यापाऱ्या वर सौद्यात भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा उप निबंधक मंगेश सुर वसे होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटेनेच्या वतीने १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चाची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सांगली मार्केट कमिटी मध्ये सोमवारी दुपारी बैठक झाली या बैठकीला सचिव महेश चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, संचालक प्रशांत पाटील मजलेकर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे बेदाणा असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, अशोक बाफना , मनोज मालू आदी उपस्थित होते
यावेळी खराडे म्हणाले व्यापारी शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजाने पैसे देतात मात्र बेदाण्याचे पेमेंट दोन दोन महिने देत नाहीत त्यामुळे २१ दिवसा पेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास दोन टक्के व्याज लावून पेमेंट करावे , सर्व बारदनाचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना  मिळतात मग बॉक्स चे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत.

५०० ग्रॅम पेक्षा जास्त तूट धरल्यास संभधित अडत दुकान दारावर कारवाई व्हायला पाहिजे , स्तोरेज मध्ये जेवढे दिवस बेदाणा ठेवला तेवढेच भाडे आकारले पाहिजे ,बेदाणा दर पडणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे , कोल्ड स्तोरे ज भरली अशी आवई उठवून दर पाडू नका , तसेच द्राक्ष दलालाची नोंदणी बाजार समितीने करावी अशा आग्रही मागण्या केल्या. प्रशांत पाटील माजलेकर यांनी ५०० ग्रॅम पेक्षा जास्त तूट या पुढे धरली जाणार नाही ती तपासणी पथका मार्फत केली जाईल त्यात चुकीचे आढल्यास किंवा शेतकऱ्याची तशी तक्रार आल्यास संबधित अडत दुकान दाराला सौड्यात भाग घेण्यास बंदी घात ली जाईल दरष्टेपणा दिवसा पेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास २ टक्के व्याज देण्याची तयारी आहे पण या पुढे आम्ही वेळेवर च पेमेंट करू अशी ग्वाही दिली.
 
राजेंद्र कुंभार  यांनी बेदाणा बॉक्स बाबतीत निम्मे पैसे देण्याची तयारी आहे मात्र हे पैसे खरेदीदार देणार आहेत. त्यामुळे त्याच्याशी आम्ही चर्चा करतो तसेच केवळ सांगली आणि तासगाव पुरताच हा निर्णय झाल्यास खरेदी दार दुसऱ्या मार्केट मध्ये खरेदी साठी जातील त्यामुळे पंडरपुर सोलापूर आणि विजापूर या ठिकाणीही हा निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली शेवटी उपनिबंधक  सुरवसे  यांनी सांगितले ५०० ग्रॅम पेक्षा ज्यादा तूट धरता येणार नाही पेमेंट वेळेतच करायला पाहिजे, बॉक्सचे निम्मे पैसे दिले पाहिजेत या सर्व बाबीची तपासणी करण्यासाठी पुन्हा एक महिन्यांनी बैठक घेवून या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहू केली यावेळी जिल्हा युवाध्यक्ष  संजय बेले जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रबाबा माने  संजय खोळखुंबे भरत चौगुले उमेश मुळे अतुल झाबरे सुरेश वसगडे  भरत पाटील दामाजी दुबळ नंदू नलवडे बाळासाहेब लिंबेकाई हरी कांबळे अजित हलिगले सुदाम माळी मनोज मालू कांतिभाई पटेल विठल पाटील द्राक्षे, बेदाणे उत्पादक शेतकरी  आदीसह अन्य उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.