एलसीबी, वाहतूक शाखा, बीडीडीएसला बदलीसाठी आता मैदानी, लेखी परीक्षा
सातारा: एलसीबी, वाहतूक नियंत्रण शाखा, बॅम्ब शोध पथक, डॅग हॅण्डलर या विभागात बदली हवी असणाऱ्यांना आता मैदानी आणि लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. एकूण ५० गुणांची ही परीक्षा असणार आहे. वरील सवर् विभागात बदलीसाठी अजर् केलेल्यांची आज परीक्षा घेतली जात आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गुणवत्तेच्या आधारावरच त्या-त्या शाखेत बदली करणार असल्याचे यातून स्पष्ट संकेत दिले आहेत.
एलसीबीत काम करू इच्छिणाऱ्या पुरूषांसाठी दहा गुणांची १६०० मीटर धावणे तर महिलांसाठी दहा गुणांची ८०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी ठराविक वेळ नोंदवणाऱ्यांना गुण दिले जाणार आहेत. शिवाय पुरूषांसाठी दहा गुणांची पुल अप्स चाचणी घेण्यात येणार आहे. तर महिलांसाठी दहा गुणांची पुल बारला लटकण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. गतवषीर्च्या डिटेक्शनसाठी ५ गुण दिले जाणार आहेत. शिवाय वीस गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मिळालेल्या बक्षीसांसाठी पाच गुण दिले जाणार आहेत.
वाहतूक शाखेत बदली हवी असल्यास इच्छुक पुरूषांना दहा गुणांची १६०० मीटर तर महिलांसाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी द्यावी लागणार आहे. पुरूषांसाठी पुल अप्ससाठी दहा गुणांची तर महिलांना पुल बारला लटकण्याची चाचणी द्यावी लागणार आहे. उत्कृष्ट कामगिरी, कम्युनिटी पोलिसिंग यासाठी पाच गुण देण्यात येणार आहेत. वीस गुणांची लेखी परीक्षा तर बक्षीसांसाठी पाच गुण देण्यात येणार आहेत. बीडीडीएस टेक्निशियन यासाठी वरीलप्रमाणेच चाचण्या द्याव्या लागणार आहेत. बीडीडीएस कोसर् केला असल्यास पाच गुण देण्यात येणार आहेत. डॅग हॅण्डलरसाठी वरीलप्रमाणेच चाचण्या द्याव्या लागणार असून त्याशिवाय डॅगसोबत परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी दहा गुण देण्यात येणार आहेत.
पोलिस अंमलदारांच्या सावर्त्रिक बदल्यांमध्ये पारदशर्कता यावी तसेच गुणवत्तेच्या आधारेच संबंधित विभागात अंमलदारांची नियुक्ती व्हावी यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यंदा नवी पद्धत सुरू केली आहे. त्याचे पोलिस अंमलदारांकडून स्वागत केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.